Vadgaon Maval : साहित्य कला संस्कृती मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांची निवड

एमपीसी न्यूज- साहित्य कला संस्कृती मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांची निवड नुकतीच निवड करण्यात आली. संस्थेच्या विश्वस्त आणि कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये एकमताने मयूर ढोरे यांची निवड करण्यात आली.

संस्थेचे मुख्य विश्वस्त अॅड. सहदेव मखामले यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. आपल्या निवडीनंतर मावळ तालुक्यातील स्वयंभू लेखन करणाऱ्या साहित्यिकांची एक नवीन चळवळ उभारण्याचा मानस ढोरे यांनी बोलून दाखवला. मावळ तालुक्यातील कथा, कविता, स्फुट लेखन करणाऱ्या व्यक्तींनी येत्या शनिवारी (दि. 23) संध्याकाळी 5 वाजता ढोरे यांच्या संपर्क कार्यालयात आपल्या साहित्यकृतींसह उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे विश्वस्त सचिव अर्जुन गायकवाड यांनी केले आहे.

लेखक गो नी दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1980 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून विविध साहित्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.