Vadgaon Maval : मोरया नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मयूर ढोरे

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ नगरपंचायत हद्दीतील पहिल्या नागरी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची पहिली सभा पार पडली. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत एकमताने 2019-24 या पाच वर्षासाठी अध्यक्ष म्हणून मयूर प्रकाश ढोरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून रजनीश भास्करराव ढोरे यांची निवड करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष मयूर ढोरे यांनी संस्था स्थापनेमागची उद्दिष्टे व ध्येय या संदर्भात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच समाजातील वंचित घटकांना बचतीच्या व सहकाराच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे व समाजहित जोपासण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

संस्थेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

कार्याध्यक्ष- महेंद्र दत्तात्रय ढोरे
सचिव- मकरंद प्रतापराव ढोरे
खजिनदार- पुनम खंडेराव जाधव
सहखजिनदार- अजित रमेश काळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.