Vadgaon Maval : पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज- पोलिसांप्रती असलेल्या सामाजिक भावनेतुन वडगाव मावळ पोलीस व त्यांच्या कुटुंबियासाठी, महसूल विभाग कर्मचारी याकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन व शारंगधर फार्मा प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल भवन वडगाव येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी मावळचे आमदार संजय बाळा भेगडे, तहसीलदार रणजित देसाई, प्रदेशाध्यक्ष गजानन द.चिंचवडे, नायब तहसीलदार सुनंदा भोसले, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, संपर्क प्रमुख हरिश आप्पा मोरे, अमोल भेगडे, शुभम चिंचवडे, वडगाव पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.हाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक निम, देसाई ,कदम तसेच मान्यवर व पोलीस फ्रेन्डस् असोसिएशन मावळ अध्यक्ष किरण राक्षे, संदीप कल्हाटकर, रवी पवार, मंगेश शेलार, अमोल कोंडे, युवराज चिंचवडे, तेजस खेडेकर, सनी अरगडे, वैभव घोटकुले, ऋषिकेश घोटकुले, रमेश पिचड पदाधिकारी व सभासद मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये पोलीस कर्मचारी व महसूल विभागातील कर्मचारी मिळून एकूण 126लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे अध्यक्ष किरण राक्षे यांनी केले. आभार कार्याध्यक्ष मंगेश शेलार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.