Vadgaon Maval : परत पंतप्रधान झाल्यास मोदी हुकूमशहा होतील – उमेश पाटील

एमपीसी न्यूज- मावळच्या सत्ताधारी खासदाराला मावळचे प्रश्न सोडविता आले नाही, रेडझोन सारखा महत्वाचा प्रश्न सोडविता आला नाही अशा उमेदवाराला जनता माफ करणार नाही. मोदी- शहा पुन्हा सत्तेवर आले तर नरेद्र मोदी देशाचे हुकुमशहा होतील. मतदारांना मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही असे प्रतिपादन प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणिस उमेश पाटील यांनी केले.

वडगाव मावळ येथे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना, मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त व मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी पाटील बोलत होते.

यावेळी विदुरा नवले, मदन बाफना, विजय कोलते, बबनराव भेगडे, प्रदीप गारटकर, कृष्णराव भेगडे, पै चंद्रकात सातकर, बापूसाहेब पठारे, बाळासाहेब ढोरे, अर्चना घारे, बापुसाहेब भेगडे, रमेश साळवे, रुपेश म्हाळसकर, सचिन घोटकुले, किरण गायकवाड, मगंलदास बांदल, सुवर्णा राऊत, शोभा कदम, सुनील भोंगाडे, माऊली तळावडे, सुरेश चौधरी,सुरेश धोत्रे, बाबुराव वायकर, संतोष मुऱ्हे, दीपक हुलावळे, गणेश खांडगे, गणेश काकडे, अंकुश आंबेकर, संतोष भेगडे, आशिष खांडगे, मयूर ढोरे, कैलास गायकवाड, सुनील दाभाडे, नवनाथ चोपडे, विक्रम कलवडे आदी उपस्थित होते.

यावेळी वाढदिवसानिमित्त माजी मंत्री मदन बाफना , पार्थ पवार व बबनराव भेगडे यांचा फेटा, शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिलीप ढमाले, रूपेश म्हाळसकर, किरण गायकवाड, चंद्रकांत सातकर, मंगलदास बांदल, रमेश साळवे, विजय कोलते,बबनराव भेगडे, मदन बाफना आदींची यावेळी भाषणं झाली.

अध्यक्षीय भाषणात जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, कार्यकर्त्यांनी कोण काय म्हणते या फंदात पडण्यापेक्षा आपल्या बूथवर मतदान कसे वाढेल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.

स्वागत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले तर प्रास्ताविक संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केले.
सूत्रसंचालन किशोर भेगडे, विशाल वहीले यांनी केले तर आभार सचिन घोटकुले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.