Vadgaon Maval: मोरया महिला प्रतिष्ठानतर्फे 38 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मोरया महिला सन्मान २०२० या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कुलस्वामिनी महिला मंचच्या संस्थापिका सारिकाताई शेळके, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, भाग्यश्री ठाकूर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेविका शारदा ढोरे, प्रमिला बाफना, पूनम जाधव, माया चव्हाण,चेतना ढोरे,अबोली ढोरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशाताई (आरोग्यसेविका), घरकाम करणाऱ्या महिला, नर्सिंग कोर्स प्रशिक्षणार्थी महिला तसेच महिला खेळाडूंना मान्यवर तसेच संचालिकाच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन अशा एकूण 38 महिलांचा सत्कार करून गौरविण्यात आले. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या मान्यवर व सर्व महिलांना गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी दीप्ती पन्हाळकर यांचे ‘महिला सक्षमीकरण” या विषयावर व्याख्यान झाले तसेच वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश निंबाळकर व सारिका शेळके यांनी महिलांना “स्वसंरक्षण” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच समाजातील सर्वच घटकांनी महिलांचा आदर व प्रतिष्ठा राखली जावी याकरिता प्रतिष्ठानच्या वतीने शपथ देण्यात आली. यावेळी वडगाव शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रास्ताविक अबोली ढोरे, चेतना ढोरे यांनी केल तर सूत्रसंचालन पूनम जाधव यांनी केले आणि आभार प्रतीक्षा गट, कविता नखाते यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.