Vadgaon Maval : नगर पंचायत अंदाजपत्रकात रस्ते व पदपथांसाठी 10 कोटींची तरतूद, कोणतीही करवाढ नाही

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ नगरपंचायतीच्या 2020 -2021 च्या एकूण 63 कोटी 49 लाख 81 हजार 403 रूपये खर्चाच्या व सुमारे 5 लाख 31 हजार 501 रुपये शिल्लकीच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. अर्थसंकल्पात इमारत बांधकामासाठी 4 कोटी 22 लाख रूपयांची, तर रस्ते व पदपथांसाठी सुमारे 10 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु कोणतीही करवाढ सुचवली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

 

नगर पंचायतीची विशेष सभा नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, गटनेते राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, प्रमिला बाफना, चंद्रजीत वाघमारे, प्रवीण चव्हाण उपस्थित होते. सभेमध्ये मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी 2020 – 21चा प्रारंभिक शिल्लक 6 कोटी 20 लाख 99 हजार 600 रूपयेचा अर्थसंकल्प सादर केला.

 

महसुली व भांडवली असा 63 कोटी 55 लाख 12 हजार 904 रूपये जमा रक्कमेचा व महसुली व भांडवली मिळून 63 कोटी 49 लाख 81 हजार 403 रूपये खर्च दाखवलेला आहे. अर्थात 5 लाख 31 हजार 501 रूपये शिल्लकीचा हा अर्थसंकल्प आहे.

 

कार्यालयीन वेतन 1 कोटी 53 लाख 36 हजार रूपये, आस्थापना खर्च 1 कोटी 95 लाख 86 हजार रूपये, शौचालये दुरूस्ती 25 लाख रूपये, नवीन विद्युत खांब उभारणी व दुरुस्ती 20 लाख रुपये, पाणी योजना दुरुस्ती 1 कोटी 57 लाख रूपये, स्मशानभूमी विकास 25 लाख रूपये, इमारत बांधकाम 4 कोटी 22 लाख रूपये, गटारे व नाले बांधकाम 3 कोटी 67 लाख रूपये, रस्ते व पदपथ बांधकाम 10 कोटी 50 लाख रूपये, पाण्याच्या टाक्या व पाणी योजना 10 कोटी 46 लाख रुपये खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्याच बरोबर दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, अंध व अपंग प्रत्येकी पाच टक्के निधीची तरतूद केली आहे.

 

दृष्टीक्षेपात अर्थसंकल्प
 जमा
महसुली-      9,15,87,127 रूपये
भांडवली    48,1826177 रूपये
……………………………………….
एकूण जमा 63,55,12,904 रूपये

……………………………………………
खर्च
महसुली  12, 9,15,953 रूपये
भांडवली 51,40,65,451 रूपये
………………………………………..
एकूण खर्च 63,49,81,403 रूपये
………………………………………….
शिल्लक 5,31,501 रूपये 
…………………………………..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.