Vadgaon Maval : नरवीर तान्हाजी मालुसरे अन् वीर नारोजीबापू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी पुष्पहार अर्पण

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे महाराष्ट्र गिरी भ्रमण यांच्या वतीने नरवीर तान्हाजी मालुसरे आणि वीर योध्दा नारोजीबापू देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त समाधीच्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आले. समाधीच्या ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय, ‘हर हर महादेव’ या घोषणा देण्यात आल्या.

स्वराज्यासाठी नरवीर तान्हाजी मालुसरे सिंहगड लढाईमध्ये वीरमरण आले. तर, सुरत लुटीचा खजिना वाचवण्यासाठी वडगाव मावळ येथील लढाईमध्ये वीर योध्दा नारोजीबापू देशपांडे यांना वीरमरण आले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः वडगाव मावळ येथील देशपांडे यांच्या समाधीला पहिली पायरी बसवली. वडगावचा हा इतिहास जतन करण्याचे काम शिवव्याख्याते रवींद्र यादव आणि त्यांच्या महाराष्ट्र गिरी भ्रमण ग्रुपने केला.

यावेळी सचिन ढोरे, तुषार वहिले, किरण चिमटे, अक्षय औताडे, मोरे सर,गणेश टकले, राजू मोरे, सुतार आदी शिवभक्त उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like