Vadgaon Maval : डान्सबार धार्जिण्या भाजपा विरोधात वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वाक्षरी आंदोलन

एमपीसी न्यूज- डान्सबार बंदीचा निर्णय कायम राहावा यासाठी प्रयत्न न करता भाजपा सरकारने सर्वोच्च न्यायालयात मुद्दाम कमकुवत बाजू मांडली, असा आरोप वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याच्या निषेधार्थ डान्सबार मालक धार्जिण्या भाजप सरकारचा निषेध करीत भित्तिचित्रे फलकावर नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि सह्या करून शुक्रवारी (दि. 17) अनोखे आंदोलन करण्यात आले. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भाजप सरकारच्या धोरणांविषयी कमी शब्दात अतिशय मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी वडगाव शहर महिला अध्यक्षा ज्योती जाधव, नगरसेविका शारदा ढोरे, पूजा वहिले, तळेगाव शहर अध्यक्षा सुनीता काळोखे, मीनाक्षी ढोरे, शैलजा काळोखे, अल्पसंख्याक महिला सेलच्या तालुका अध्यक्ष शबनम खान, जिल्हा युवक सरचिटणीस विशाल वहिले, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष आफताब सय्यद, अतुल राऊत, जिल्हा विद्यार्थी सरचिटणीस स्वामी गायकवाड, तालुका विद्यार्थी अध्यक्ष नवनाथ चोपडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया नोंदवा आंदोलनाचे संयोजन राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, विद्यार्थी अध्यक्ष राहुल ढोरे, विनय लवंगारे, अक्षय रौंधळ, निखील नवघणे, सुहास विनोदे, मंगेश खैरे, मनोज खेंगरे आदिंनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.