Vadgaon Maval : राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा बुधवारी लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे होणार आहे अशी माहिती संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, मावळ तालुका काँग्रेस आय अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, एस आर पी अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, शेकाप अध्यक्ष माऊली तळवडे यांनी दिली.

माजी खासदार नानासाहेब नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित राहणार असून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे, काँग्रेसचे नेते माउली दाभाडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, वडगाव मावळचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, शेकापचे माउली तळावडे आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे संयोजन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.