Vadgaon Maval : स्थानिक कलाकार, खेळाडू यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी अशा ‘मावळ फेस्टीवल’ची गरज -प्रवीण दरेकर

एमपीसी न्यूज – स्थानिक कलाकार आणि खेळाडू यांच्या कला-गुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे फेस्टीवल होणे गरजेचे आहे. यातूनच चांगले खेळाडू तसेच कलाकार घडतील आणि मावळचे नाव राज्यात उंचावतील, असे प्रतिपादन विधानपरीषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.

येथील मावळ फेस्टीवल ग्रुपने ग्रामदैवत श्री.पोटोबा महाराज मंदीराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या मावळ फेस्टीवलचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, गणेश ढोरे, मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राहल ढोरे, फेस्टीवलचे अध्यक्ष सागर जाधव, रवींद्र भेगडे, बाळासाहेब ढोरे, सुभाष जाधव, राजू खांडभोर, प्रशांत ढोरे, नीलेश राक्षे, ॲड. तुकाराम काटे आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार बारणे म्हणाले, फेस्टीवलच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्याचे काम होत आहे. राजकारण विरहित काम करुन मावळचा सर्वांगीण विकास करा.

आमदार शेळके व माजी मंत्री भेगडे यांनीही मावळ फेस्टीवलच्या उपक्रमाचे कौतूक केले. सर्वांनी एकत्रितपणे तालुक्याचा विकास करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी सुरेशभाई शहा यांना जीवनगौरव, शंकरराव शेलार यांना कृषीरत्न व तळेगाव दाभाडे येथील कलापिनी संस्थेला कलागौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कलापिनीच्या वतीने डॉ. अनंत परांजपे यांनी तो स्वीकारला.

कार्यक्रम प्रमुख महेंद्र म्हाळसकर यांनी स्वागत केले. फेस्टीवलचे संस्थापक प्रवीण चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. संचालक भूषण मुथा यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच नितीन कुडे यांनी आभार मानले. त्यानंतर धुमधडाका हा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. अभिनेत्री भार्गवी चिरमुले या कार्यक्रमाची मुख्य आकर्षण होती. ‘बोल मै हलगी बजावू क्या?, फेम विशाल आणि साजन, ‘चला हवा येऊ द्या, फेम स्नेहल शिदम आदींचा या कार्यक्रमात सहभाग होता. या कलाकारांनी बहारदार नृत्ये सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली.

मावळ फेस्टिवलच्या संचालकांनी गोपालकांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी मावळ फेस्टीवलच्या पदाधिकार्यांचे कौतुक केले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाला रसिकांची तुडुंब गर्दी झाली होती.

मावळ फेस्टिवल दुरावलेला समाज एकत्र करण्याचे पवित्र काम करीत आहे – हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर
सध्या परीस्थितीत समाज दुरावला जात असून बहीण भाऊ, भावाभावातील रक्ताची नाती तुटु लागली आहेत. मावळ फेस्टिवल सामाजिक कार्यक्रम राबवून हा दुरावलेला समाज एकत्र करण्याचे काम करीत असून हि काळाची गरज आहे, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले. येथील किर्तनाच्या वेळी ते बोलत होते.

हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर म्हणाले, माणसाला आतले ज्ञान पाहिजे. बाहेरचे नको जास्त डिग्र्या घेतल्या म्हणून तो ज्ञानी झाला असे नाही ज्ञानच देव व देवच ज्ञानच आहे. परंतु, वैराग्य शिवाय ते टिकू शकत नाही, असे सांगून सध्या संपत्तीच्या लोभापायी भाऊ – बहीण, भावाभावात वाद होत आहे. नाते कुणाचेही तोडा परंतु रक्ताचे नाते तोडू नका, असे सांगून रक्तातीच नातेच वेळेला धावून येतात मित्र नाही.

महिलांनी पाणी, विज, तोंड जपून वापरा. तर पुरुषांनी ताकद, पैसा, प्रतिष्ठा जपून वापरा. लग्नातील वायफळ खर्च टाळून शालेय मुलींच्या फी भरा. गरीबाला मदत करा, ही काळाची गरज असल्याचे इंदुरीकर यांनी सांगितले.

  • कार्यक्रमाचे नियोजन फेस्टीवलचे अध्यक्ष सागर जाधव व कार्यक्रम प्रमुख महेद्र म्हाळस्कर , यांच्यासह गुलाबराव म्हाळस्कर, विनायक भेगडे, शंकर भोडंवे, पवन भंडारी, बंडोपंत धर्माधिकारी, अरुण वाघमारे, सुरेश जांभुळकर, जितेंद्र कुडे, शैलैंद्र ढोरे, नितीन कुडे, किरण म्हाळसकर, शामराव ढोरे, रविद्र काकडे, प्रमोद म्हाळसकर, नामदेव ढोरे, सलिम तांबोळी, बाळासाहेब भालेकर, दत्तात्रय लंके, शेखर वहीले या संचालक मंडळाने संयोजन केले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like