Vadgaon Maval News : किल्ले तिकोणा गडावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज – आज सर्वत्र गणरायाच्या आगमणाने वातावरण आनंदीमय झाले आहे. किल्ले तिकोणा गडावरही बाप्पाचे आगमण झाले. गडावर आज भरपूर पाऊस होता. तरीही मावळे मोठ्या आनंदात बाप्पाचा, छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांचा जय घोष करत बाप्पासह गडावर पोचले.

 

 

तळजाई माता लेणी परिसरात गणरायासाठी सजावट केलेल्या मंडपात बाप्पाचे मोठ्या मनोभावे सचिन ढोरे व कृषिअधिकारी सुधाकर मोरे यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली.

त्यानंतर पहिल्या दिवसाचा आरतीचे माणकरी म्हणून धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठण यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. हभप अशोक महाराज आडकर यांची कीर्तन सेवा झाली. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची सुविधा होती.

दुर्गसंवर्धनाची भावना निर्माण व्हावी, गडास पूर्वीप्रमाणे वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने स्थापण केलेल्या एका आगळ्या वेगळ्या दुर्गसंवर्धनाच्या श्री गणेशाचे दर्शन घ्यायला नक्की या.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.