Vadgaon Maval News: राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वडगाव शहराध्यक्षपदी मयूर गुरव, लोणावळा शहराध्यक्षपदी समीर खोले

वडगाव मावळ – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या पश्चिम विभागाची आढावा बैठक प्रभारी व निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वडगाव शहर अध्यक्षपदी मयूर सुरेश गुरव, लोणावळा शहर अध्यक्षपदी समीर राजेंद्र खोले, आंदर मावळ उपाध्यक्षपदी भाऊसाहेब सखाराम सुतार यांची निवड करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार व ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी सेलच्या चाललेल्या कामकाजाची माहिती जाणून घेण्यासाठी पुणे येथील पीडीसीसी बँक हॉल येथे आढावा बैठक झाली.

या बैठकीस पुणे शहराध्यक्ष व आमदार चेतन तुपे, प्रभारी लतिफभाई तांबोळी, निरीक्षक सतीश दरेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे, पुणे शहराध्यक्ष ओबीसी सेलचे संतोष नांगरे, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रभारी व मावळ अध्यक्ष ओबीसी सेल अतुल राऊत, प्रदेश उपाध्यक्षा राजश्री भगत, मावळ प्रभारी  मंगेश खैरे, उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, दत्तात्रय आंबेकर, सरचिटणीस रमेश सुतार, देहूरोड अध्यक्ष स्वप्नील माळी, सोमनाथ धोत्रे, अतुल ढोरे, विकी ढोरे,  तसेच सर्व विधानसभा अध्यक्ष ,शहर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्व विधानसभा अध्यक्ष यांनी प्रभारी व निरीक्षक यांना आपला कार्यअहवाल सादर केला व मनगोत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.