-MPC-TOP-MOST-BANNER-I

Vadgaon maval News : ‘विना अनुदानित शैक्षणिक संस्थांना शासकीय मदत मिळून देण्यासाठी आमदार शेळके यांनी पाठपुरावा करावा’

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे आमदार सुनील शेळके यांना पत्र

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील जनतेच्या हितासाठी समाजातील घटकांना आर्थिक मदत आणि विना अनुदानित शैक्षणिक संस्थांना शासकीय मदत मिळून देण्यासाठी आपले राजकीय बळ वापरून पाठपुरावा करावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना पत्राद्वारे केली आहे.

मागील आठवड्यात आमदार सुनील शेळके यांनी माजी राज्यमंत्री भेगडे यांना पत्र पाठवून शैक्षणिक फी सवलतीसाठी पत्राद्वारे विनंती केली होती.

त्यावर माजी राज्यमंत्री भेगडे यांनी त्या विनंतीला प्रतिसाद देत मावळ तालुक्यातील शिक्षण संस्था चालकांच्या बैठकीत पालकांना फी मध्ये सवलत देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असे उत्तर दिले, पण शासन स्तरावर आपल्या राजकीय संबंधाचा योग्य वापर करून मावळच्या जनतेच्या हितासाठी समाजातील विविध घटकांना आर्थिक मदत आणि विना अनुदानित शैक्षणिक संस्थांना शासकीय मदत मिळून देण्यासाठी विशेष पाठपुरावा करून आपण मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षाही माजी राज्यमंत्री भेगडे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

भेगडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोविड 19 परिस्थितीमध्ये सर्वचजण जनतेला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोविडचा सामना करताना सर्वसामान्य जनतेचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अनेक कुटुंब उद्धवस्त झाली असून घरातील व्यक्‍ती गेल्यामुळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सामान्य नागरीक, नोकरदार वर्ग, बारा बलुतेदार, शेतकरी, टपरीधारक, हातगाडीवाला, फेरीवाला,रिक्षावाला, टेम्पोवाला, रस्त्यावर विक्री करणारा सामान्य व्यावसायीक यासह मध्यमवर्गीय व व्यापारी यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या सर्वांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

आपण तालुक्‍याचे प्रतिनिधीत्व विधानसभेत करीत आहात व आपल्या विचाराचे महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे, त्यामुळे त्यांना थेट मदतीसाठी आपण पुढाकार घ्यावा. यासाठी आमचे आपणास सहकार्य राहील, असेही भेगडे यांनी पत्रात
म्हटले आहे.

शैक्षणिक चळवळ ही राज्याच्या व देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. विद्यार्थी हा देशाच्या प्रगतीचा केंद्रबिंद आहे. त्यासाठी जी पावले उचलावी लागतील त्यासाठी सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना बरोबर घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेऊ. परंतु, याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघण्याची गरज आहे.

माझ्या शब्दाचा वेगळा अर्थ काढू नये. परंतु, शैक्षणिक क्षेत्राला खिळ बसू नये व संस्था आणि विद्यार्थी यांच्या हिताचा विचार करताना आपण टोलवाटोलवी न करता दोन्ही बाजूने याचा गांभीयाने विचार करून सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे, असेही पत्रात स्पष्ट केले आहे.

आपल्या विनंतीनुसार या बाबतची बैठक घेण्याचे पत्र मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे यांना दिलेले आहेत. त्यासंदर्भातील पत्र आपणास सोबत पाठवित असल्याचेही भेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn