Vadgaon Maval News: वडगाव उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे चंद्रजित वाघमारे बिनविरोध

पनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीकडून चंद्रजित वाघमारे यांनी तर भाजपच्या वतीने दिलीप म्हाळसकर यांनी अर्ज दाखल केला होता.

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चंद्रजित वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली.

यापूर्वीच्या उपनगराध्यक्षा माया चव्हाण यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्या रिक्त पदासाठी मंगळवार (दि. 11) नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली.

मंगळवार सकाळी 11 ते 12 दरम्यान उपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीकडून चंद्रजित वाघमारे यांनी तर भाजपच्या वतीने दिलीप म्हाळसकर यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही अर्ज छाननीत वैध ठरले. अर्ज मागे घेण्याची मुदत असताना मुदतीपूर्वी दिलीप म्हाळसकर यांनी अर्ज मागे घेतला.

उपनगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी एकमेव चंद्रजित वाघमारे यांचा अर्ज राहिल्याने उपनगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा मयुर ढोरे यांनी केली.

वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत विकास कामे करण्यासाठी अग्रेसर राहणार आहे. प्रामाणिकपणे व निष्ठेने पक्षकार्य केल्याचे हे फळ असल्याचे चंद्रजित वाघमारे यांनी यावेळी सांगितले.

नगरपंचायतमध्ये सद्यपरिस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व अपक्ष अशा महाविकास आघाडीची सत्ता असून या आघाडीकडे नऊ तर भाजप सात व एक अपक्ष असे मिळून आठ सदस्य आहेत.

शहराच्या विकासासाठी व सहकार्यासाठी भाजपने दिलीप म्हाळसकर यांचा अर्ज मागे घेतल्याचे प्रभारी भास्कर म्हाळसकर यांनी सांगितले. पक्षभेद विसरून सर्व नगरसेवक शहराचा सर्वांगीण विकास करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी यावेळी व्यक्त केला

याप्रसंगी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, गटनेते राजेंद्र कुडे, प्रमिला बाफना, दिनेश ढोरे, माजी उपनगराध्यक्षा माया चव्हाण, अर्चना म्हाळसकर, नगरसेवक राहुल ढोरे, प्रवीण चव्हाण, नगरसेविका शारदा ढोरे, पुनम जाधव, पुजा वहिले, सायली म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, सुनील ढोरे, शाम ढोरे, दशरथ केंगले, सुनिता भिलारे, दिपाली मोरे आदींसह सर्व नगरसेवक नागरिक उपस्थित होते.

निवडीनंतर मावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, राष्ट्रवादी ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, भारिपचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश गायकवाड, माजी सरपंच तुकाराम ढोरे, पंढरीनाथ ढोरे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस गंगाराम ढोरे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत ढोरे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल वहिले, तालुका सरचिटणीस सुदाम कदम, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील दाभाडे, सरचिटणीस प्रवीण ढोरे, राजेश बाफना, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अफताब सय्यद, ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत आदींच्या उपस्थितीत वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.