Vadgaon Maval News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन आंबेकर यांचे निधन

टाकवे ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आंबेकर व राष्ट्रीय वेट लिफ्टर सुनील आंबेकर यांचे ते वडील होत.

एमपीसी न्यूज- टाकवे बुद्रूक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध बैलगाडा मालक बबन बाबूराव आंबेकर (वय 70) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, दोन भाऊ, सूना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

टाकवे ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आंबेकर व राष्ट्रीय वेट लिफ्टर सुनील आंबेकर यांचे ते वडील होत. तर श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर व टाकवे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक दिलीप आंबेकर यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.