Vadgaon Maval News: संविधानामुळे देश एकसंघ – अशोक बाफना

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आजही देश एकसंघ आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा ठेवा त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव अशोक बाफना यांनी केले.

वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य, अध्यापक व डी एड महाविद्यालयाच्या वतीने सोमवारी (दि. ६) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात अशोक बाफना बोलत होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, संचालक चंद्रकांत ढोरे, गंगाराम ढोरे, प्राचार्य हिरामण लंघे, प्रा. महादेव वाघमारे, प्रा. संदीप गाडेकर, प्रा. शीतल दुर्गाडे, प्रा. शीतल शिंदे, प्रा. कविता तोटे, प्रा. ज्योती रणदिवे, प्रा. शीतल देवळालकर, प्रा. सोनाली पाटील, ग्रंथपाल सुजाता जाधव, बहुसंख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिता धायगुडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अशोक गायकवाड यांनी केले. आभार प्रा. संतोष शिंदे यांनी मानले..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.