Vadgaon Maval : मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी निकिता घोटकुले तर, उपसभापतीपदी दत्तात्रय शेवाळे

एमपीसी न्यूज -मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या निकीता नितीन घोटकुले यांची बिनविरोध निवड तर, उपसभापतीपदी दत्तात्रय नाथा शेवाळे यांनी राष्टवादीचे साहेबराव कारके यांचा तीन मतांनी पराभव करीत विजय संपादन केला.

मावळ पंचायतीसाठी सभापतीपद हे सर्वसाधारण महिला या जागेसाठी आरक्षण आले होते. आज मावळ पंचायतीत सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक आली. सभापतीपदासाठी निकीता घोटकुले आणि राजश्री राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु राऊत यांनी माघार घेतल्याने घोटकुले यांची बिनविरोध निवड झाली.

मावळ पंचायत समितीत भाजपाचे सहा तर राष्टवादीचे चार सदस्य आहेत. दत्तात्रय शेवाळे व राष्ट्रवादीचे साहेबराव कारके यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत त्यांना भाजपाची पाच सदस्यांनी मतदान केले तर विद्यमान उपसभापती जीजाबाई पोटफोडे या गैरहजर होत्या.राष्ट्रवादीचे साहेबराव कारके यांना तीन मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी शेवाळे विजयी झाल्याचे जाहीर केले.

यावेळी सहाय्यक म्हणुन मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी उपस्थित होते. यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, सुवर्णा कुंभार, शांताराम कदम, ज्योती शिंदें , राजश्री राऊत, महादु उघडे, आदी सदस्य उपस्थित होते.

यावेळी निवडीनंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, बाळासाहेब घोटकुले, प्रशांत ढोरे, संदीप काकडे, संतोष कुंभार, सुमित्रा जाधव आदीसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभापती निकीता घोटकुले ह्या चांदखेड गणातून तर उपसभापती दत्तात्रय शेवाळे वडेश्वर गणातून निवडून आले आहेत. निवडीनतंर भंडा-याची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.