Vadgaon Maval : राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत नितीन म्हाळसकर सलग तिस-यांदा ठरले स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य पाॅवरलिफ्टिंग असोसिएशन व जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत वडगाव मावळ येथील शिवछ्त्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर हे सलग तिस-यांदा स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र या पदकाचे मानकरी ठरले.

कल्याण येथे झालेल्या या स्पर्धेत म्हाळसकर यांच्यासह त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणा-या इंद्रायणी महाविद्यालय व्यायामशाळेतील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्रचा मानकरी ठरलेल्या म्हाळसकर यांनी मास्टर गटामध्ये 455 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.

ज्युनिअर 53 किलो वजनी गटात प्रज्वल शेलार याने 315 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले, 59 किलो वजनीगटात कुंदन शिशुपाल याने 405 किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. तर 120 किलो वजनी गटात आमत्य नलावडे याने 487 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. सिनिअर गटात 83 किलो वजनी गटात 83 किलो वजनी गटात गौरव विटे याने 547 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले.

म्हाळसकर यांची केरळ येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक रवींद्र यादव, प्रसिद्ध उद्योजक, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संभाजी मलघे यांचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.