Vadgaon Maval : श्री पोटोबा देवस्थानच्या कार्याला सर्वतोपरी मदत करणार- खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगांवचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांचे कार्य लोकाभिमुख आहे तसेच देवस्थानचा अहवाल हा जिल्ह्यात आदर्श अहवाल म्हणून प्रसिद्ध असल्या कारणाने केंद्र शासनाच्या माध्यमातून देवस्थानची राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तसेच देवस्थानला ‘क’ दर्जा मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करणार असे आश्वासन खासदार आप्पा बारणे यांनी देवस्थानच्या विश्वस्तांना दिले.

यावेळी मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळस्कर, उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव व माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर आदीजन उपस्थित होते.

“श्री पोटोबा महाराज देवस्थानला ‘क’ दर्जा प्राप्त झाल्यानंतर हे देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात येईल व नंतर राज्य व केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन खऱ्या अर्थाने देवस्थानची उद्दीष्टे पूर्ण होतील”असे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.