_MPC_DIR_MPU_III

Vadgaon Maval : वनवासी बांधवांच्या मूलभूत गरजांसाठी संदीप खरे व सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज – मावळच्या दुर्गम डोंगरपठारावरील वनवासी बांधवांच्या व मूक पशुधनाच्या पिण्याचे पाणी, औषधोपचार, सौर उर्जा प्रकल्प, शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी मावळ विचार मंच संचलित मावळ पठार सुविधा समितीने प्रसिद्ध गायक, कवी संदीप खरे व सलील कुलकर्णी यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या अभिनव निधी संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज (गुरुवारी, दि.28) सायंकाळी सहा वाजता वडगाव मावळ मधील भेगडे लॉन्स येथे होणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

आयुष्यावर बोलू काही या बहारदार गीत, संगीत व काव्यमैफिलीसाठी दोन हजार, 500 आणि 300 रुपये तिकीट आहे. यामध्ये अल्पोपहार आणि लकी ड्रॉ ची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रथम येणा-यांस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तिकिटांसाठी 9096881833, 9850527771, 9011325050, 9552510627, 9850727372, 9822042484, 9850177012, 9921387472, 9158888417, 9922208138, 9371218193 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.