Vadgaon Maval : बेरोजगार कारागिरांना सरकारी योजना मार्फत कर्ज उपलब्ध करून देणार -अंकुश आंबेकर

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील कारागिरांना व्यवसायासाठी निधीची गरज असते. अशा ग्रामीण भागातील दिशाहीन बेरोजगार कारागिरांना खादी ग्रामोद्योग संघाच्या वतीने अनेक सरकारी योजना मार्फत कर्ज उपलब्ध करून त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर यांनी केले.

मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या वतीने येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित ग्रामीण कारागीर मेळाव्यात अंकुश आंबेकर मार्गदर्शन करतांना बोलत होते.

यावेळी जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाचे पर्यवेक्षक संजिवजी मोरे, खादी ग्रामोद्योग चे उपाध्यक्ष गणेश भांगरे, संचालक चंद्रजित वाघमारे, चंद्रकांत दहीभाते, सुदेश गिरमे, सोपान कदम, लक्ष्मण भालेराव निवृत्त सचिव भुसारी, सचिव एस एच पिचड , अतुल राऊत, दिनेश जाधव, किसन काळे, दत्ता कदम, आरिंफ तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पर्यवेक्षक मोरे यांनी खादी ग्रामोद्योग संघाच्या मार्फत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत सेवा उद्योगास 10 लाख उत्पादक प्रक्रिया उद्योगास 25 लाखापर्यंत कर्ज मर्यादा असून सीएमईजीपी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत सेवा उद्योगास 10 लाख आणि उत्पादक प्रक्रिया उद्योगास 50 लाखपर्यंत आहे.

या योजनेत सर्व साधारण वर्गासाठी कर्जाच्या 25 टक्के अनुदान दिले जाते व अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक, ओबीसी, महीला, माजी सैनिक, अपंग उद्योजकास कर्जाच्या 35 टक्के अनुदान दिले जाते, असे सांगून हे सर्व अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरले जातात.

प्रास्ताविक संचालक चंद्रजित वाघमारे यांनी केले तर, आभार गणेश भांगरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.