Vadgaon Maval: श्री पोटोबा देवस्थानच्या दहाव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन

पोटोबा देवस्थानचे मावळ तालुक्यामध्ये उल्लेखनीय कार्य चालू आहे. लोकप्रतिनिधींपेक्षा आपले काम हे समाजासाठी दिशा देणारे ठरत असते, असे खासदार बारणे यांनी म्हटले.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या दहाव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे व माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. संप्रदाय क्षेत्रातील प्रमुख मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.

खासदार बारणे म्हणाले की, पोटोबा देवस्थानचे मावळ तालुक्यामध्ये उल्लेखनीय कार्य चालू आहे. लोकप्रतिनिधींपेक्षा आपले काम हे समाजासाठी दिशा देणारे ठरत असते व त्या आधारावरच तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजातील काही मंडळी काम करत असतात.

ज्ञान, भक्ती व शक्ती या विचारांवर आपले काम खऱ्या अर्थाने समाज घडवण्याचे कार्य करत आहे, म्हणूनच आपले काम श्रेष्ठ आहे.

यावेळी अखिल भारतीय वारकरी संप्रदाय मावळचे अध्यक्ष दत्ता महाराज शिंदे, हभप अर्जुन फलके, हभप सुखदेव ठाकर, हभप गणेश जांभळे, मावळ भाजपचे प्रभारी भास्कर म्हाळसकर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, कुंभार समाजाचे जिल्हा अध्यक्ष संतोष कुंभार, देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त सचिव अनंता कुडे, सहसचिव किरण भिलारे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त अ‍ॅड अशोक ढमाले, अ‍ॅड तुकाराम काटे, विश्वस्त अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव, सुनिता कुडे आदींसह पुजारी मयुर गुरव व पुरोहित विश्वास भिडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता कुडे यांनी केले. प्रास्ताविक मुख्य विश्वस्त सोपान म्हाळसकर तर आभार सुभाष जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.