Vadgaon Maval : कान्हे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम राजेंद्र सातकर यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- कान्हे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम राजेंद्र सातकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीच्या सरपंच राजश्री सदाशिव सातकर यांचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

यावेळी सरपंचपदासाठी पूनम सातकर यांचा एकमेव अर्ज आल्याने, त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम व्ही खोमणे यांनी जाहीर केले. सहाय्यक म्हणून निंबाळकर तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी एस बी धेंडे यांनी काम पाहिले.

यावेळी मावळत्या सरपंच राजश्री सातकर, उपसरपंच अभिजीत सातकर, माजी उपसरपंच किशोर सातकर, सागर येवले, प्रदीप ओव्हाळ, मधुरा ओव्हाळ, ग्रामपंचायत सदस्य सतीश सातकर, राजेंद्र सातकर, विष्णू सातकर, शशीकला सातकर, भारती सातकर, जिजाबाई वावरे, मीनाक्षी चव्हाण, ताराबाई भोईर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.