Vadgaon : मावळात आज 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; ग्रामीणमध्ये 11, शहरी भागात 20 बाधित

Maval recorded 31 corona positive patients today; 11 affected in rural areas, 20 in urban areas : ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात आज, बुधवारी विविध भागात मिळून एकूण 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये शहरी भागातील 20, तर ग्रामीण भागातील 11 रुग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे एका महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.  आजच्या अहवालात ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरी भागातील तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत 14, वडगाव नगर पंचायत आणि लोणावळा नगरपरिषद हद्दीत प्रत्येकी 3,  अशा 20 रुग्णांचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागामध्ये कामशेत, ऊर्से, कोंडीवडे, कान्हेफाटा, गहुंजे, वराळे या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. इंदुरी येथे 2, तर कुरवंडे येथे 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आजपर्यंत मावळ तालुक्यात एकूण 455 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 163 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 11 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, 7 रुग्णांना आज, बुधवारी घरी सोडण्यात आले.

दरम्यान, आज दुपारी एक वाजता लोणावळा येथील 35 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे कामशेत येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाला थायरॉईड आणि रक्तदाबाचा आजार होता.

सध्या तालुक्यात 281 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 165 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून, 116 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असल्याची महिती तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.