Vadgaon Maval : खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी रोहिदास गराडे यांची तर, उपाध्यक्षपदी चंद्रभागा तिकोणे

एमपीसी न्यूज – खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे रोहिदास गराडे यांची तर, उपाध्यक्षपदी चंद्रभागा तिकोणे यांची निवड झाली आहे. संघाचे यापूर्वीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोणते, उपाध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता. सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.

यावेळी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहिदास गराडे व प्रकाश पवार यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु रोहिदास गराडे यांनी हात वर करून, तर प्रकाश पवार यांनी गुप्त मतदानाची मागणी केली. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी सुर्यवंशी यांनी हात वर करून मतदान घेण्यास मान्यता दिल्याने प्रकाश पवार आणि त्यांचे समर्थक सभागृहातून निघून गेले. त्यामुळे गराडे यांच्या बाजूने बहुमत राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी यांनी गराडे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच उपाध्यक्षपदासाठी तिकोने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी यांनी जाहीर केले.

या आधीच्या कार्यकाळात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने भाजपाबरोबर हातमिळवणी करून दोन्ही पदे घेतली होती. त्यामुळे बहुमत नसतानाही यानिमित्ताने भाजपाला ऐती संधी मिळून एक एकदा अध्यक्ष व उपाध्यक्षपद मिळाले होते. परंतु राज्यासह मावळात झालेल्या सत्तांतरामुळे झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र आले. त्यातच काँग्रेसचे रोहिदास गराडे यांचा राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे साहजिकच खरेदी विक्री संघावर आता महाविकास आघाडीचे प्रभुत्व निर्माण झाले आहे.

निवडीनंतर माजी मंत्री मदन बाफना, नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका अध्यक्ष सुनील दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक घारे, भाऊसाहेब मावकर, रूपाली दाभाडे, तानाजी पडवळ आदी मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

HB_POST_END_FTR-A2
You might also like