Vadgaon Maval : प्रा. संदीप गाडेकर यांना शिक्षणशास्त्र या विषयात पीएच.डी.

एमपीसी न्यूज- प्रा. संदीप गाडेकर याना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिक्षणशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. गाडेकर हे मागील 12 वर्षांपासून अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

गाडेकर यांनी डेव्हलपमेंट अँड इफेक्टिव्हनेस ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट फॉर टीचर ट्रेनिंग कॉलेजेस या विषयावर संशोधन केले यासाठी त्यांना प्राचार्य डॉ भूषण पाटील यांनी मार्गदर्शन केले. आपल्या या यशाचे सर्व श्रेय त्यांनी आपले आई वडील व प्राथमिक शिक्षक ते पदव्युत्तर पर्यंतचे सर्व शिक्षक यांना दिले आहे. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मदन बाफना, चेअरमन तुकाराम असवले, सचिव अशोकजी बाफना सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. संदीप गाडेकर यांचे हार्दीक अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या

गाडेकर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी हवेली येथे तर माध्यमिक शिक्षण सेनापती बापट विद्यालय पारनेर या शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज पारनेर येथे घेतले. तर न्यू आर्ट्स अँड सायन्स कॉलेज पारनेर येथून बीएस्सी फिजिक्स ही पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून बीएड, एम एड, एमएस्सी, एमफिल, नेट व सेट शिक्षणशास्त्र या पदव्या संपादन केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.