Vadgaon Maval : भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी संदीप काकडे, कार्याध्यक्षपदी अर्जुन पाठारे यांची निवड

एमपीसी न्यूज – मावळ तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी संदीप काकडे यांची तर, कार्याध्यक्षपदी औंढे गावचे माजी सरपंच अर्जुन पाठारे यांची निवड झाली असून जिल्हा भाजप युवा मोर्चा कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घोटकुले यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे राज्यमंत्री व पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष बाळाभाऊ भेगडे यांनी वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात आज निवड जाहीर केली. यामुळे त्यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तीन नूतन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.

  • ज्येष्ठ नेते व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली शिंदे, जिल्हा प्रभारी गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, महाराष्ट्र युवा मोर्चा पदाधिकारी जितेंद्र बोत्रे यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर झाली. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ह्या निवडी केल्याचे समजत आहे.

यावेळी भाजपा कार्याध्यक्ष अजित आगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गुंड, सभापती सुवर्णा कुंभार, सरचिटणीस बाबुलाल गराडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.