Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादीच्या सोशल मिडीयाच्या अध्यक्षपदी संजय शेडगे

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मिडीयाच्या अध्यक्षपदी आढले खुर्द येथील युवा कार्यकर्ते संजय एकनाथ शेडगे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

यावेळी पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, मावळ केसरी पै विकास वाघोले, मावळ तालुका युवक ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष कैलास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. शेडगे हे राष्ट्रवादीचे क्रियाशील कार्यकर्ते असून ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडीयाचे सरचिटणीस आहेत.

आगामी काळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून पक्ष्याच्या ध्येयधोरणाची जनजागृती करुन पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार असल्याचे शेडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.