Vadgaon Maval : सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयात (दि.3 जानेवारी) सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिन कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन ग्रुप गटातील छात्रअध्यापक व मार्गदर्शक डॉ.संदीप गाडेकर यांनी केले होते. अध्यापक महाविद्यालयात हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रीन गटाचे मार्गदर्शक डॉ.संदीप गाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपट विषयक माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.महादेव सांगळे होते त्यांनी आपल्या मनोगतामधून सावित्रीबाई च्या कार्याला उजाळा दिला व त्यांच्यातील गुण विद्यार्थी शिक्षकांनी आमलात आणावे असे प्रतिपादन केले.

यावेळी विद्यार्थी शिक्षक कोमल शेपूर, ज्योती चव्हाण, नम्रता वावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी पवार यांनी, अध्यक्षांचा परिचय नेहा सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन ब्लेसी नदार हिने केले.

यावेळी डॉ.कविता तोटे, डॉ.शीतल देवळालकर, सहा.प्रा.ज्योती रणदिवे, सहा.प्रा.सोनाली पाटील, सुरेश घोजगे, सुजाता जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.