Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी भाजपचे शामराव ज्ञानेश्वर ढोरे यांची बिनविरोध निवड

ढोरे हे मावळ फेस्टीवलचे माजी अध्यक्ष असून विद्यमान संचालक

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते शामराव ज्ञानेश्वर ढोरे यांची आज, शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव नगरपंचायतीत भाजपचे स्वीकृत सदस्य म्हणून अॅड विजय जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर ढोरे यांची निवड करण्यात आली.

वडगाव नगरपंचायतीत भाजपचे स्वीकृत सदस्य म्हणून अॅड विजय जाधव यांना संधी मिळाली होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने व सर्वाना संधी मिळावी यासाठी त्यानी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या पदासाठी आज, शुक्रवारी निवडणूक झाली. शामराव ढोरे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुवर्णा ओगले यांनी सांगितले. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष मयूर ढोरे होते.

यावेळी मावळ तालुका भाजपाचे प्रभारी भास्कर अप्पा म्हाळसकर, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते सोपानराव ढोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले, वडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळसकर, संचालक नंदकुमार दंडेल, नंदकुमार चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य बंडोपंत भेगडे, भाजपा शहर अध्यक्ष किरण भिलारे, माजी सरपंच संभाजी म्हाळसकर, नितीन कुडे, माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, युवती अध्यक्षा धनश्री भोंडवे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, गटनेते दिनेश ढोरे, दशरथ केंगले, नगरसेविका सुनीता भिलारे, दीपाली मोरे, अॅड विजय जाधव, सरचिटणीस संपत म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष भूषण मुथा, दीपक बवरे, प्रसाद पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ढोरे हे मावळ फेस्टीवलचे माजी अध्यक्ष असून विद्यमान संचालक आहेत. मान्यवरांच्या हस्ते ढोरे यांचा सत्कार करण्यात आला. वडगाव शहरातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.