Vadgaon Maval : ‘शिवराज ग्रुप’ने किल्ले बनवा स्पर्धेतील स्पर्धकांना घडविली अकरा किल्यांची सफर

दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले बनवा स्पर्धा 2019चे केले होते आयोजन

एमपीसी न्यूज – शिवराज ग्रुप वडगाव मावळच्या वतीने आत्तापर्यंत साधारण 1300 स्पर्धकांना अकरा किल्यांची सफर घडविण्यात आली आहे. किल्ल्यांची माहिती महत्त्व इतिहास समजावून सांगितला जातो. गेल्या आठ वर्षापासून ही परंपरा शिवराज ग्रुपने चालू ठेवली आहे.

दरवर्षी दिपावलीत किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना दरवर्षी वेगवेगळ्या गडकिल्ल्यांची मोफत सफर घडवली जाते. लहान गट व खुला गट या दोन गटामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. रोख रक्कम व ट्राॅफी असे बक्षीसांचे स्वरूप असते.बक्षीस वितरणही गड किल्ल्यावर होते.

आतापर्यंत अनुक्रमे किल्ले रायगड, शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, पन्हाळा,वढु तुळापुर(संभाजी महाराज बलिदान स्थळ), अकलुज,अजिंक्यतारा, सज्जनगड आणि यंदा किल्ले तिकोणा गडाची मोफत सफर घडविण्यात आली. बक्षीस वितरणही किल्ल्यावरच करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: लहान गट-
प्रथम क्रमांक – सिंहगर्जना ग्रुप-लोहगड, सॅफ्रान सोसायटी-लोहगड

व्दितीय क्रमांक –मावळगर्जना ग्रुप-जंजिरा, जयहिंद मित्र मंडळ-लोहगड

तृतीय क्रमांक – विनित वहिले-सज्जनगड, आदित्य कुंभार-तोरणा

_MPC_DIR_MPU_II

खुला गट-
प्रथम क्रमांक – छावा प्रतिष्ठान-प्रतापगड

व्दितीय क्रमांक – स्वरांजली ग्रुप-अवचितगड

तृतीय क्रमांक – संकल्प लोहोट-कोराईगड, शिवमुद्रा ग्रुप- पन्हाळा

८ वर्षापासून परीक्षक व मार्गदर्शक म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे प्रा.अनिल कोद्रे सर, व्याख्याते – विवेक गुरव सर यांना उत्कृष्ट परीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट कलाकृती पुरस्कार – विश्वजीत गुरव.(९ फुटी कागदाचा गणपती)

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.
संस्थापक – अक्षय बाबुराव वायकर
अध्यक्ष – तुषार वसंतराव वहिले
कार्याध्यक्ष – भाऊसाहेब तुकाराम ढोरे
सचिव – सुहास विनोदे
उपाध्यक्ष – बाळासाहेब धोंडिबा.तुमकर, सतिश अर्जुन ढोरे
खजिनदार – रोहित सुदेश गिरमे, नवनाथ शेळके.
सहखजिनदार – सोनु पिंजण, तुषार हुलावळे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.