Maval: ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमास फोर्स मोटर्स कंपनीचा एक हात मदतीचा… 

एमपीसी न्यूज – मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमास प्रतिसाद देत फोर्स मोटर्स कंपनीने  टाकवे बु, कान्हे, जांभूळ, कामशेत परिसरातील 500 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट दिले. आमदार सुनील शेळके यांनी फोर्स मोटर्स कंपनीचे व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वसामान्यांचा रोजगार बुडाला असून त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत टाकवे बु परिसरातील ५०० गरजू कुटुंबाना आमदार सुनील शेळके व फोर्स कंपनीच्या सहकार्याने महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले.

टाकवे बु परिसरात औद्योगिक वसाहत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कंपन्या बंद असल्याने येथील आसपासच्या भागात राहणाऱ्या कामगारांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून औद्योगिक वसाहतीतील कामगारांना प्रथम प्राधान्य देत हे जीवनावश्यक कीट देण्यास प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात केली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन करुन हे वाटप करण्यात आले.

‘आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली टाकवे आणि परिसरातील गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमदारांनी केलेल्या आवाहनानुसार तालुक्यातील कुठलीही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही या भागात घेऊ’ असे सरपंच सुप्रिया मालपोटे यांनी सांगितले.

यावेळी फोर्स मोटर्सचे मॅनेजर देवेंद्र पाटील, सरपंच सुप्रिया मालपोटे, तलाठी मलबारी मॅडम, ग्रामसेवक एस. बी. बांगर, पो पाटील अतुल असवले, उपसरपंच रोहीदास असवले,अविनाश असवले, उद्योजक भरत सातकर, अनिल मालपोटे, गोरख मालपोटे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष शिवाजी असवले, चंद्रकांत असवले, अनिल असवले, अजिंक्य असवले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

सामाजिक संस्थांचे दातृत्व; गरजूंना ‘मदतीचा हात’

कोरोना लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले मजूर तसेच रोजगार बंद झाल्यामुळे अडचणीत आलेल्या गरजू कुटंबांसाठी वडगाव मावळमधील विविध सामाजिक संस्था, मंडळे व संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

छावा प्रतिष्ठान व जय जवान जय किसान मित्र मंडळातर्फे भाजीपाला वाटप

वडगाव मावळ येथील भाजपा युवा मोर्चाचे वडगाव शहराचे कार्याध्यक्ष शेखर वहिले, छावा प्रतिष्ठान वडगावचे अध्यक्ष गणेश वहिले आणि अॅड राकेश वहिले यांच्या अध्यक्षतेखाली गावातील 250 कुटुंबांना भाजीपाला वाटण्यात आला.

सध्या जगभरात कोरोनाचे थैमान आणि लॉकडाऊन असल्याने सर्वत्र व्यवहार ठप्प झालेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये वडगाव शहरात जय जवान जय किसान मित्र मंडळ आणि छावा प्रतिष्ठानच्या वतीने ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे. यामध्ये गरजू कुटुंबाला शासनाचे सर्व नियम पाळत मदत केली जात आहे. सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना गरीब गरजू नागरिकांना याचा अधिक फटका बसला आहे. यामुळे त्यांच्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. गावातील प्रत्येक घरात दररोज चूल पेटून सर्वांना पोटभर अन्न मिळायला हवे म्हणून आमचे हे कार्य चालू आहे असे शेखर वहिले यांनी यावेळी सांगितले. यामध्ये निलेश पाटील, निखिल वहिले, ओंकार शिंदे, योगेश ढोरे, सलमान शेख, संतोष काळे आणि इतर सभासद दिवसरात्र या कार्यात सहभागी झाले आहेत.

‘चांगभलं ग्रुप’च्या वतीने गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू किट

 

एक हात मदतीचा या संकल्पनेतून चांगभलं ग्रुपच्या वतीने गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू किट स्वरूपात स्वःखर्चातून 50 कुंटुबाना आज देण्यात आले. वडगाव पोलीस उपनिरीक्षक शीला खोत, पोलीस अधिकारी मनोज कदम, वडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, लक्ष्मणराव म्हाळसकर, कार्यक्रम प्रमुख महेंद्र म्हाळसकर, रोहिदास म्हाळसकर, विजय म्हाळसकर,राजेश आगळे, रवींद्र म्हाळसकर, राजेंद्र म्हाळसकर, विनायक म्हाळसकर ,आकाश म्हाळसकर, शंशाक म्हाळसकर, प्रतीक मोतिबने, प्रवीण म्हाळसकर, ओंकार चाफगावकर, सुयश म्हाळसकर, शुभम म्हाळसकर, टिंग्या म्हाळसकर, प्रज्वल म्हाळसकर यांच्या हस्ते देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.