Vadgaon Maval : पाणी योजनांच्या कामांना गती द्या – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत असणाऱ्या प्रादेशिक (Vadgaon Maval) पाणीपुरवठा योजनांची कामे मावळ तालुक्यात विविध ठिकाणी सुरू आहेत. कामांची गती काहीशी मंदावली असल्याचे आमदार सुनील शेळके यांच्या निदर्शनास आले. त्यासाठी त्यांनी मंगळवारी (दि. 28) वडगाव मावळ येथे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, संबंधित ठेकेदार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संयुक्त आढावा बैठक घेतली. त्यात पाणी योजनांच्या कामांना गती द्यावी अशा सूचना आमदार सुनिल शेळके यांनी अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील मोठ्या पाणी योजना येत आहेत.या योजनांची कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.याच पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे आमदार सुनिल शेळके यांनी कामांची सद्यस्थिती, समस्या जाणून घेण्यासाठी सरपंच, सदस्य, ग्रामसेवक,संबंधित ठेकेदार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.२८) संयुक्त आढावा बैठक घेतली.

डोंगरगाव-कुसगाव योजनेसाठी 6 कोटी 10 लक्ष, डोणे-आढले 3 कोटी 25 लक्ष, कार्ला 7 कोटी, खडकाळा 10 कोटी 51 लक्ष, पाटण योजनेसाठी 19 कोटी रु.निधी उपलब्ध झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनांची कामे संथ गतीने सुरु आहेत.तसेच काही ठिकाणी या कामांमध्ये दिरंगाई होत असल्यामुळे प्रत्यक्षात अडचणी कोणत्या आहेत यावर बैठकीत चर्चा झाली.

Pimpri : उड्डाणपूलाचा केला जर ‘असाही’ वापर; तर शहर होईल स्वच्छ-सुंदर

प्रादेशिक पाणी योजनांची कामे पूर्ण झाल्यास या भागातील प्रत्येक घरापर्यंत पाणी मिळणार असून अनेक वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.त्यामुळे स्थानिक पातळीवरील ज्या समस्या असतील त्या (Vadgaon Maval) लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी समन्वय साधून सोडविण्याचा प्रयत्न करावा,असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले.

या भागातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी प्रलंबित कामांना गती देऊन कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.