Vadgaon Maval : राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेत संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज- राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेत मावळ तालुक्यातील शेटेवाडी येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. प्रथम क्रमांकाचे 51 हजार रुपयांचे पारितोषिक विभागुन देण्यात आले. खेड तालुक्यातील मलघेवाडी येथे दि 8 व 9 जानेवारी रोजी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागातून, जिल्ह्यातून 80 भजन संघ सहभागी झाले. त्यापैकी 74 भजनी संघानी सादरीकरण केले.

मंडळातील गायक भजन सम्राट नंदकुमार शेटे, उत्कृष्ट गायिका आशाताई नंदकुमार शेटे यांनाही वैयक्तिक गायनाचे पारितोषिक मिळाले. तसेच उत्कृष्ट तबला वादक म्हणून सागर सोरटे यांनाही पारितोषिक मिळाले. परीक्षक म्हणून माऊली महाराज पिंगळे, अय्यर, थोपटे , मोहिते आदींनी काम पाहिले.

_MPC_DIR_MPU_II

स्पर्धेचे आयोजन जय मल्हार मित्र मंडळ, मलघेवाडी, तालुका खेड व ग्रामस्थ यांनी केले होते. भजन सम्राट नंदकुमार शेटे यांनी यापूर्वी भजन गायनामध्ये अनेक पारितोषिके पटकावलेली असून अनेक गावांमध्ये त्यांना गायनासाठी आमंत्रित केले जाते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.