Vadgaon Maval: प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांची मावळ तालुक्याला भेट

मावळ तालुक्यातील ओबीसी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एमपीसी न्यूज- प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्याबरोबर संवाद’ साधला. मावळ तालुक्यातील ओबीसी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मावळचे आमदार सुनील शेळके यांचे जनसंपर्क कार्यालय आणि वडगाव नगरपंचायत कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी आमदार सुनील शेळके, मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, ओबीसी सेल प्रभारी मंगेश खैरे, उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे उपस्थित होते.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस सचिन औटी, महाराष्ट्र प्रदेश चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग सरचिटणीस प्रशांत खिलारे, ग्राहक पंचायत राज्य सेक्रेटरी अरुण वाघमारे, नगरसेवक राजेंद्र कुडे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण चव्हाण, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल वहिले, सुरेश गुरव, चद्रकांत राऊत, नितीन भांबळ, व्याख्याते विवेक गुरव, किरण देवघरे, इकबाल मोमीन, राजेंद्र राऊत, शंकर साकोरे, नंदकुमार दंडेल, प्रकाश चिवटे, ओबीसी सेल नाणे मावळ अध्यक्ष शेखर कटके, प्रथमेश घाग, विराज राऊत, मंदार घारे, कौशल राऊत, अवधूत गायकवाड यांची उपस्थिती होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.