Vadgaon Maval : श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते -गोपीचंद कचरे

कचरेवाडी येथे हरकचंद रायचंद बाफना डी.एड.कॉलेजचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

एमपीसी न्यूज – श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचे दर्शन घडते, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलते, असे प्रतिपादन मावळ तालुक्यातील कचरेवाडी गावचे सरपंच ह.भ.प.गोपीचंद कचरे यांनी केले. कचरेवाडी (ता.मावळ) येथे हरकचंद रायचंद बाफना डी.एड.कोलेजच्या तीन दिवसीय (दि.०६ ते ०८ मार्च) श्रमसंस्कार शिबिर पार यावेळी ते बोलत होते.

श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन ह.भ.प.गोपीचंद कचरे व ग्रामसेवक पोळ, दत्तात्रय गरुड व जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक दळवी मंजुशा यांच्या हस्ते झाले.

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गाव परिसर, शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांना व शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून ‘मुलींची आत्महत्या, व्यसनाधीनता , अंधश्रद्धा, पर्यावरण शिक्षण, स्वच्छता’ आदीविषयी जनजागृती केली. तसेच पथनाट्यातून विविध विषय मांडले.

तसेच विद्यार्थ्यांनी गृहभेटी घेऊन गावाचा इतिहास जाणून घेतला. शिबिरअंतर्गत ऐतिहासिक विषयावर व्याख्याते सचिन ढोबळे सर यांनी आपल्या वाकचातुर्याने प्रतापराव गुजर व छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र उलघडले. त्यात मनोज भांगरे, गोकुळ लोंढे, अंकुश मोरमारे आजी-माजी विध्यार्थ्यानी भेटी दिल्या. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे व सचिव अशोक बाफना यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

शिबिराचे संयोजन प्राचार्य हिरामण लंघे, प्रा.राजेंद्र डोके, प्रा.मनोज गायकवाड, प्रा.शुभांगी हेंद्रे, प्रा.शितल गवई, प्रा.योगेश जाधव, प्रा.सुधा भालेकर, प्रा.संध्या थोरात, नंदकिशोर मुगेरा व सेवक सोमनाथ धोंगडे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबीर संचालक प्रा. राजेंद्र डोके व सहसंचालक शितल गवई यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनोज गायकवाड यांनी केले व प्रा.शुभांगी हेंद्रे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.