BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी ग्रामीण ब्लाॅकच्या अध्यक्षपदी सुभाषराव जाधव

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी ग्रामीण ब्लाॅकच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते सुभाषराव पंडितराव तथा रघुनाथराव जाधव यांची रविवारी (दि. 6) नियुक्ती करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, मावळ तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत उपस्थित होते. रविवारी (दि 6) झालेल्या पक्षाच्या बैठकीत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी जाधव यांची नियुक्ती जाहीर केली व जिल्हाध्यक्ष गारटकर यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

सुभाषराव जाधव हे पक्ष स्थापनेपासुन राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी या अगोदर पक्षसंघटनेत सरचिटणीस, खजिनदार म्हणून अत्यंत प्रामाणिक आणि कुशलतेने काम केले असून सध्या ते राष्ट्रवादी सहकार सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

HB_POST_END_FTR-A4

.