Vadgaon Maval : मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून अकरा वर्षीय मुलाची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

एमपीसी न्यूज – वडगाव मधील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून (Vadgaon Maval) नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने वडगाव शहरात फेब्रुवारी महिन्यात महाआरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरात एका अकरा वर्षीय मुलाच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदर्शनास आले मात्र त्या मुलाच्या कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मोरया प्रतिष्ठानने मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला सुरुवातीला प्रतिष्ठानच्या माध्यमातून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली त्यानंतर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हृदयाची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
वडगाव मध्ये राबविण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला विविध रुग्णांनी भेट दिली होती. महाआरोग्य शिबिरला भेट दिलेल्या अतिशय तत्पर अशा या रूग्णांवर या मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत मोफत ऑपरेशन व उपचार करण्यात येत आहे.

 

 

Bjp :  पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे ‘सावरकर गौरव यात्रा’

आत्तापर्यंत शहरातील सुमारे सहा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यात मणका, गुडघे, डोळे, घसा, नाक इत्यादी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून शहरात वास्तव्यात असलेल्या वडगाव मधील अतिशय लहान अशा जावेद रेहमान या अकरा वर्षीय मुलाच्या हृदयाला छिद्र होते. त्यांच्या कुटुंबाची अर्थीक परिस्थिती खूप बिकट असल्याने त्या मुलाचे वय वर्षे तीन असल्यापासून ते आज अकरा वय वर्षे असे पर्यंत फक्त पैशाअभावी या कुटुंबाला या लहान मुलाचे ऑपरेशन करण्यासाठी विविध अडचणींना (Vadgaon Maval) सामोरे जावे लागत होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.