Vadgaon Maval: मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी सुधीर भागवत

Vadgaon Maval: Sudhir Bhagwat as a block Development Officer of Maval Panchayat Samiti विद्यमान गटविकासाधिकारी माळी यांची भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीमध्ये बदली झाली आहे.

एमपीसी न्यूज- मावळ तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांची भंडारा जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी एस. पी. भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाचे उपसचिव पंडित जाधव यांच्या आदेशाने शुक्रवारी (दि 12) रोजी गटविकासाधिकारी माळी यांची भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीमध्ये बदली झाली आहे.

माळी हे दोन वर्षांपूर्वी मावळ पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून रूजू झाले होते. त्यांचा कालावधी तीन वर्षाचा होता.

त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस पी भागवत यांची मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.