Vadgaon Maval : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी मावळ तालुक्यातील हभप सुखदेवमहाराज ठाकर

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मावळ तालुक्यातील प्रभारी जिल्हाध्यक्ष हभप सुखदेवमहाराज ठाकर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मंडळाच्यावतीने अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. त्यामध्ये मावळ तालुक्याचे हभप सुखदेवमहाराज ठाकर यांना वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाशमहाराज बोधले यांच्या शुभ हस्ते पुणे जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हभप सुधाकरमहाराज इंगळेसह पदाधिकारी, राज्यातील तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. याआधी ठाकर हे जिल्हा प्रभारी म्हणून कार्यरत होते. मावळ तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारर्किद विशेष प्रेरणादायी ठरली आहे. यापुढे ही वारकरी संप्रदायातील त्यांचे कार्य अविरतपणे पुढे ठेवणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी  सांगितले. त्यांच्या निवडीने तालुक्यात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.