Vadgaon Maval : मावळ तालुका शेतकरी आठवडे बाजारतर्फे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचा नगरसेवक किशोर भेगडे यांच्या संकल्पनेतून चालू झालेल्या शेतकरी आठवडे बाजारच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांना शेतकऱ्यांकडील पालेभाज्या व फळभाज्या आकर्षक टोपलीमध्ये भेट म्हणून देण्यात आल्या. आठवडे बाजाराचे आयोजक तुषार वहिले, सौरभ सावले,चेतन दुधाळ यांच्यातर्फे ही भेट देण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल वहिले, अल्पसंख्याक सेलअध्यक्ष आफताब सय्यद, मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रभारी मंगेश खैरे, तळेगाव शहर राष्ट्रवादी माजी युवक अध्यक्ष व युवा उद्योजक अनिकेत भेगडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.