Vadgaon Maval : सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी सुनील शिंदे तर, कार्यक्रमप्रमुखपदी अर्जुन ढोरे

19 एप्रिलला होणार सामुदायिक विवाह सोहळा

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी सुनील शिंदे तर कार्यक्रमप्रमुखपदी अर्जुन ढोरे यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा 19 एप्रिल रोजी निश्चित करण्यात आला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सोहळा समितीची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. बैठकीस राजेंद्र वहिले, राजेश बाफना, विलास दंडेल, अविनाश चव्हाण, राहुल ढोरे, गणेश विनोदे, अतुल राऊत, अजय धडवले, शंकर ढोरे, राकेश वहिले, मंगेश खैरे, चंद्रजित वाघमारे, रोहिदास गराडे, सतीश तुमकर, शरद ढोरे, खंडू काकडे, संभाजी येळवंडे, महेश तुमकर आदी संचालक उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी शिंदे व कार्यक्रमप्रमुखपदी ढोरे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी सदाशिव गाडे, सोमनाथ धोंगडे, सचिवपदी शरद ढोरे, सहसचिव पदी संजय दंडेल, खजिनदारपदी अनिल कोद्रे, सहखजिनदारपदी सुनील दंडेल, व्यवस्थापकपदी अरुण वाघमारे, काशिनाथ भालेराव, विवेक गुरव यांची निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.