BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी सुवर्णा राऊत याची निवड

457
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी सुवर्णा राजेश राऊत याची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या निवडिचे पत्र दिले. राऊत या येळसे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य असून मावळ तालुका तनिष्का पतसंस्थेच्या संचालक आहेत.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, बापुसाहेब भेगडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई घारे, ललिता कोतुळकर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, अशोक घारे, किशोर भेगडे, दीपक हुलावळे, सुनील दाभाडे, सुनील भोंगाडे, ज्ञानेश्वर गोणते, बाबुराव केदारी, सतोष भेडगे याच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निवडीबद्दल बालताना राऊत म्हणाल्या की, पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार पक्षवाढीसाठी काम करणार असुन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3