Vadgaon Maval : “स्वर चैतन्य” कार्यक्रमातून रंगली वडगावकरांची दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज- मावळ सोशल फाऊंडेशन आयोजित सातव्या वर्षी दिवाळी पाडवा पहाट निमित्त “स्वर चैतन्य” संगीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सारेगम’फेम सई टेंभेकर व चैतन्य कुलकर्णी यांनी स्वरांची बरसात केली.

या कार्यक्रमाला वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, रवींद्र आचार्य, ज्ञानेश्वर वाघमारे, मावळ सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश बवरे, उपाध्यक्ष अतुल राऊत, सोपानराव म्हाळसकर ,गणेश ढोरे, मंगेश ढोरे, गुलाबकाका म्हाळसकर, तुकाराम ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, नगरसेवक राजेंद्र कुडे, अनंता कुडे, नारायण ढोरे, बाळासाहेब भालेकर, बारकू ढोरे, कार्यक्रम समितीचे-शांताराम कुडे, नितीन भांबळ, विश्वास भिडे, किरण देवघरे, दत्तात्रय कुडे, राजेंद्र केंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

सारेगम’फेम सई टेंभेकर व चैतन्य कुलकर्णी यांनी चंदेरी राती, गोमू संगतीने, अश्विनी ये ना,लल्लाटी भंडार, तू जरा माझ्याशी बोलना अशा गाण्यांसहित लावणी गाऊन कार्यक्रमाला रंगत आणली. विठ्ठल विठ्ठल या गाण्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज चव्हाण, संदेश भांबाळ, राजेश ढोरे, अवधूत गायकवाड, उदय टकले, प्रसाद बिराजदार, हर्षल ढोरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अतुल राऊत यांनी केले तर सूत्रसंचालन गिरीश गुजराणी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1