Vadgaon : मावळ तालुक्यात 12 जणांची कोरोनावर मात ; सक्रिय रुग्णांची संख्या पाच

In Maval taluka 12 people defeated Korona; The number of active patients is five

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यामध्ये मागील 27 दिवसात आढळलेल्या 17 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद नाही. त्यामुळे सध्या तालुक्यात सक्रिय रूग्णांची संख्या पाच असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

दरम्यान, आज गुरूवारी तळेगाव येथील 40 वर्षीय कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. टाकवे येथील नऊ महिन्यांच्या कोरोनाबाधित बाळाच्या निकटच्या संपर्कातील सात व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आता कोणताही तपासणी अहवाल येणे बाकी नसल्याचे तालुका आपत्ती नियंत्रण कक्षाचे समन्वयक राहूल चोकलिंगम यांनी सांगितले.

शहरी भागात सहा तर ग्रामीण भागात अकरा असे 27 दिवसात 17 रूग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी 14 रूग्ण हे दि. 19 मे ते दि. 29 मे या दहा दिवसात पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.

कोरोना बाधित 17 रुग्णांपैकी तळेगाव व माळवाडी येथील दोन महिलांना यापूर्वीच तर 31 मे रोजी अहिरवडे, चांदखेड व घोणशेत येथील तीन रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईहून नागाथली येथे आलेलय 40 वर्षीय व्यक्तीला बरे वाटल्याने 1 जूनला घरी सोडण्यात आले. 2 जून रोजी चांदखेड येथील 4 व आज तळेगाव दाभाडे येथील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या तालुक्यात 5 सक्रिय रुग्ण आहेत.

दि. 3 व दि. 4 जून या दोन दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. आतापर्यंत 12 रूग्णांनी कोरोनावर मात करून डिस्चार्ज घेतला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, हे फार दिलासादायक बातमी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.