BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : राष्ट्र उभारणीत शिक्षक हा महत्वाचा घटक -बाळा भेगडे

वडगाव येथे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचा सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – शिक्षक हा राष्ट्र उभारणीतील महत्वाचा घटक आहे, असे मत राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी वडगाव येथे व्यक्त केले. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ व नामदार संजय (बाळा ) भेगडे स्नेहग्रुप मावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजन येथील भेगडे लाॅन्स मंगल कार्यालयात करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य कामगार,पर्यावरण राज्यमंत्री ना संजय (बाळा ) भेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, मावळच्या सभापती सुवर्णा कुंभार,उपसभापती जिजाबाई पोटफोडे,माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ, परिषदेचे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे , उपाध्यक्ष पांडुरंग ठाकर,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप काकडे संतोष कुंभार, शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब आगळमे यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भेगडे म्हणाले, विद्यार्थी घडवताना शिक्षकांना अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. यामध्ये मार्गदर्शक, सल्लागार,दिग्दर्शक म्हणून कार्य करावे लागते. अनेकदा विद्यार्थी शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतात. त्यामुळे शिक्षकाचे व्यक्तीमत्व प्रभावी व वक्तृत्व बाणेदार असावे.

यावेळी गुलाब गवळे व पांडुरंग ठाकर यांनी मनोगते व्यक्त केली. या सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील व मावळ तालुक्यातील मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा ७२ गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.त्याच बरोबर कान्हे येथील शाळेतील विद्यार्थीनी सावरी सातकर हिची ऑलम्पिक कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब आगळमे यांनी केले. सूत्रसंचालन भारत काळे व प्रभा काळे,लक्ष्मण मखर यांनी केले तर, परिषदेचे कार्यवाह वशिष्ठ गटकुळ यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3