Vadgaon Maval: नगरपंचायतीच्या अन्नछत्रालयास श्री पोटोबा देवस्थानचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटप्रसंगी ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमांतर्गत वडगाव नगरपंचायतीने लोकसहभागातून सुरू केलेल्या अन्न छत्रालयास श्री पोटोबा देवस्थान विश्वस्थांकडून सढळ हाताने मदत करण्यात आली.

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वसामान्यांचा रोजगार बुडाला असून त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत असताना आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो.

या नात्याने नगरपंचायतीच्या वतीने चालू असलेल्या अन्नछत्रालयाला वडगांवचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे विश्वस्त मंडळ यांचे वतीने एक सामाजिक बांधिलकी जपत असताना 300 किलो तांदूळ मदत म्हणून देण्यात आला.

यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, विश्वस्त सचिव अनंता कुडे, सहसचिव किरण भिलारे, विश्वस्त सुभाष जाधव, तुकाराम (बुवा) ढोरे, अरुण चव्हाण, अ‍ॅड. तुकाराम काटे,  अ‍ॅड. अशोक ढमाले,  सुनीता कुडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.