Vadgaon Maval : उर्से ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रदीप धामणकर यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी उर्से या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदीप मारुती धामणकर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली. याआधीचे उपसरपंच अविनाश कारके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी निवडणूक घेण्यात आली.

धामणकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सतिश कालेकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

२००७ पासून सामाजिक आणि राजकीय कामाचा वसा वारसा हाती घेऊन निघालेला एक युवा तरुण. गेल्या 10 वर्षापासून उर्से ग्रामपंचायतचे काम करत असताना समाजामध्ये अनेक प्रकारच्या सरकारी योजना व मावळ तालुक्यातील युवा तरुणांना रोजगार, व्यवसाय मार्गदर्शन असे अनेक वेगवेगळे उपक्रम, आरोग्य शिबीर, मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नेहमी प्रयत्नशील म्हणून उर्से ग्रामस्थांनी युवा नेतृत्व म्हणून त्यांचेवर उपसरपंच पदाची जबाबदारी उर्से ग्रामस्थांनी सोपवली आहे.

त्यावेळी पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, सरपंच अश्विनी शिंदे, उर्मिला धामणकर, शांताबाई धामणकर, कांचन धामणकर, इंदुबाई पवार, उत्तम पोटवडे, भरत कारके, दिगंबर राऊत, बाळासाहेब धामणकर, गुलाब आंबेकर, दादाभाऊ धामणकर, जयसिंग ठाकूर, रोहिदास धामणकर, ज्ञानेश्वर धामणकर, किरण राऊत, नवनाथ घारे, कैलास सावंत व उर्से ग्रामस्थ आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

HB_POST_END_FTR-A2
You might also like