Vadgaon Maval : युवकांनी महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करावेत -डॉ. दत्तात्रय बाळसराफ

एमपीसी न्यूज – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक कायदा, विधवांचे पुर्नविवाह करणे, सती जाण्यास विरोध असे जे समाजाला मान्य नाही ते काम करण्याचे धाडस महात्मा फुले यांनी केले आहे. त्यामुळे युवकांनी महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करून चालावे, असे प्रतिपादन राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी केले.

मावळ तालुका माळी समाजोन्नती मडंळ व श्री संत सावता माळी मित्र मडंळ, शेलारवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त शेलारवाडी येथे संत सावता महाराज मंदीराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाळसराफ बोलत होते. यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले व्याख्यात्या स्नेहलता बाळसराफ ह्या होत्या.

  • बाळसराफ पुढे म्हणाले की, स्रीयांना शिक्षणापासुन दुर ठेवण्याची पध्दत फुले यांनी दुर करुन एखाद्या स्री ला शिकविले तर तुम्ही संपुर्ण कुंटुंबाला शिकविल्या सारखे होते. ज्योतीबांनी परमेश्वर माणसात पाहीला प्रगती करायची असेल तर एकत्र येणे गरजेचे आहे. स्वातंत्र, समता व बंधुता ही त्रिसुत्री ज्योतिबांनी दिली आहे.

यावेळी हभप बबन महाराज शेवकर, माजी सरपंच विनायक भुजबळ, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक सुदेश गिरमे , समता परिषद अध्यक्ष स्वप्नील माळी, डोके सर, दिलीप शिंदे, सचिन जाधव , बाळासाहेब बोरावके , हभप शशीकांत विधाटे, सजंय लोणकर, रोहीत गिरमे , किशोर शेवकर,सचिन जाधव, राहुल शेवकर , संदीप बनकर, आशिष शिंदे, प्रशांत मंडलिक, समीर घुमटकर, कैलास भुजबळ , स्वप्निल भुजबळ, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्यावेळेस विनायक भुजबळ, रोहित गिरमे, सुहास विधाटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश माळी व उषा माळी यांनी केले तर आभार उमेश माळी यांनी मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like