Vadgaon : मावळात आज 46 पॉझिटिव्ह रुग्ण; 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू

सध्या रुग्णालयात 217 आणि होम आयसोलेशनमध्ये 192  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ; Maval today has 46 positive patients; Death of 4 corona

0

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शनिवारी ) 46  नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 778  झाला आहे. आज 74 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, 4 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 20  रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 26 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण रुग्णांमध्ये सुदवडी येथील सर्वाधिक 7  रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर कुणेनामा येथील 4 , सोमाटणे येथील 3, वराळे आणि कुसगाव प. मा. येथील 2, तर इंदोरी, टाकवे बुद्रुक, गहुंजे, शिरगाव, ब्राह्मणवाडी -साते, नवलाख उंब्रे, चिखलसे, आणि सुदुंबरे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

लोणावळा शहरात आज एकही रुग्ण सापडला नाही. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत 16 आणि वडगाव नगरपंचायत हद्दीत4 रुग्ण आढळून आले.

आतापर्यंतच्या  एकूण 778 रुग्णांमध्ये सध्या 409  रुग्ण सक्रीय आहेत. तर 348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयात 217 आणि होम आयसोलेशनमध्ये 192  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like